Published in History & Culture

on

Published in History & Culture

on

Marla Tar Marla | मारला तर मारला वरून फोटू बी काढला

मारला तर मारला वरून फोटू बी काढला असा कसा रे देवा खेळ मांडला जगाच्या पोशिंद्याचा बरा संसार कार विस्कटला? ज्यासाठी तो रात्रंदिस् राबला तोडी आला घास कारे पाठविला? भाताचा खाचरातच भात केला कोंब फूटले सोयाबीन बाजरीला मक्यावर आली लष्करी आली भूईमुगाची शेंग मातीतच काली द्राक्ष बागेतच झाली शॅम्पेन डाळीबाने फेकली केनच केन कपाशीवर पडला लाल्या केळीच्या बागा सपाट केल्या कांदे ...
मारला तर मारला वरून फोटू बी काढला
असा कसा रे देवा खेळ मांडला
जगाच्या पोशिंद्याचा बरा
संसार कार विस्कटला?
ज्यासाठी तो रात्रंदिस् राबला
तोडी आला घास कारे पाठविला?
भाताचा खाचरातच भात केला
कोंब फूटले सोयाबीन बाजरीला
मक्यावर आली लष्करी आली
भूईमुगाची शेंग मातीतच काली
द्राक्ष बागेतच झाली शॅम्पेन 
डाळीबाने फेकली केनच केन
कपाशीवर पडला लाल्या
केळीच्या बागा सपाट केल्या
कांदे झाले वाकडे अन तिकडे
उले टाकूनच मोडले कंबरडे!
दिवाळीला तू कहस्च केले रागनी
इको फ्रेंडली फटाके फोडले!
बळीराजाला मारला तर मारला
वरुन आणि फोटू बी काढला।
आता तू एकच कर
लांबण वरून एकेक दोर
गळयात अडकवून येतो वर!

Join us in celebrating the power of #storytelling

Leave a Comment