Published in History & Culture

on

Published in History & Culture

on

युगांतर: गांधीजी एक क्रांतिकारी युगपुरुष

इंग्रजाच्या जुलुमशाहीला, त्यांच्या बेबंदशाहीला संघटीत ताकद आणि वाणीच्या जोरावर भिडलेला हा महात्मा खरच एक महान व्यक्तिमत्व होते. याने इंग्रजाच्या जागतिक दर्जाच्या फौजेला केवळ आपल्या लाठीच्या ताकदीच्या जोरावर नमवलं. ते मुळात एक आध्यात्मिक व्यक्तिमत्व होते, त्यांचे हृदय मोठे होते, म्हणूनच त्यांना महात्मा म्हटले गेले. पण यामुळे देश आणि समाजाच्या समस्यांपासून त्यांनी कधीच दूर पळ काढला नाही. देश आणि देशवासियांबद्दल त्यांचे प्रेम ...

इंग्रजाच्या जुलुमशाहीला, त्यांच्या बेबंदशाहीला संघटीत ताकद आणि वाणीच्या जोरावर भिडलेला हा महात्मा खरच एक महान व्यक्तिमत्व होते. याने इंग्रजाच्या जागतिक दर्जाच्या फौजेला केवळ आपल्या लाठीच्या ताकदीच्या जोरावर नमवलं. ते मुळात एक आध्यात्मिक व्यक्तिमत्व होते, त्यांचे हृदय मोठे होते, म्हणूनच त्यांना महात्मा म्हटले गेले. पण यामुळे देश आणि समाजाच्या समस्यांपासून त्यांनी कधीच दूर पळ काढला नाही. देश आणि देशवासियांबद्दल त्यांचे प्रेम आणि आपुलकी होती. त्यांनी इंग्रजीचे शिक्षण घेतले आणि ते त्या वेळी परदेशी शिकलेले बॅरिस्टर असूनही, त्यांनी मायदेशी येऊन त्यांचा संपूर्ण रंगढंग बदलला. रहाणीमान बदलत 'टाय-कोट संस्कृती' सोडून त्यांनी फक्त एक धोती अंगीकारली. इतिहासातील सर्व परकीय आक्रमणामुळे फाटलेल्या या देशात पसरलेल्या अगणित संस्कृती, रियासत एकत्र करून गांधीजींनी त्याच राष्ट्रीय अभिमानाने भारताची पुनर्रस्थापना करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. म्हणूनच आपण त्यांना राष्ट्रपिता म्हणतो.

     केवळ देशातच नव्हे तर मार्टिन ल्यूथर किंग आणि नेल्सन मंडेला सारख्यानी परदेशातही महात्मा गांधींनी महात्मा गांधींना आपला आदर्श मानले. तथापि, त्यांना अगणिक टीकेलाही सामोरे जावे लागले; त्यांना आणि त्याचे योगदान पूर्णपणे संपवून टाकण्याचे प्रयत्नही झाले. पण गांधीशिवाय भारताचा इतिहास लिहिणे शक्य आहे का? कदापि नाही, किंबहुना भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे अहिंसात्मक नेतृत्वच त्यांनी केले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

गांधीयुगाची पाश्वभूमि

गांधी युग: 1919-1948

आधुनिक इतिहास
मोहनदास करमचंद गांधी (जन्म: 2 ऑक्टोबर 1869; मृत्यू: 30 जानेवारी 1948)

 महात्मा गांधी म्हणूनही ओळखले जाणारे हे निर्भीड व्यक्तिमत्व, 9 जानेवारी रोजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले. 1893 मध्ये दादा अब्दुल्ला या भारतीय मुस्लिम व्यापा-याचा खटला लढण्यासाठी ते दक्षिण आफ्रिकेत गेले. तिथे त्याने भारतीयांशी भेदभावपूर्ण वागणूक पाहिली. एकदा जेव्हा ते दक्षिण आफ्रिकेत ट्रेनने प्रवास करत होते,त्याच वेळी मेरिट्झबर्ग नावाच्या स्टेशनवर, एका इंग्रजाने त्याला ट्रेनमधून ढकलले. या घटनेतून गांधीजींना नवी दिशा मिळाली. त्यांच्या दक्षिण आफ्रिकेतील मुक्कामा दरम्यानच गांधीजींनी भारतीयांबद्दल स्वीकारलेल्या वर्णभेदी धोरणांविरोधात संघर्ष सुरू केला. त्यांच्या चळवळीला संघटनात्मक आकार आणि दिशा देण्यासाठी त्यांनी नेटल इंडियन काँग्रेस, टॉल्स्टॉय फर्म (जर्मन कारागीर मित्र कॅलेन बागच्या मदतीने) आणि फिनिक्स आश्रम अशा अनेक संघटना स्थापन केल्या. दक्षिणेतच गांधीजींनी इंडियन ओपन नावाचे वृत्तपत्रही प्रसिद्ध केले.

गांधीजींनी भारतीय राजकारणात पदार्पण

     गांधींच्या दक्षिण आफ्रिकेतील चळवळीच्या यशस्वी आचरणाचा परिणाम म्हणून, तेथील सरकारने 1914 पर्यंत बहुतेक भेदभाव करणारे काळे कायदे रद्द केले. गांधीजींचे हे पहिले यश होते जे त्यांनी अहिंसेच्या मार्गाने मिळवले. इ.स.1915 मध्ये भारतात आल्यानंतरच गांधीजींनी भारतीय राजकारणात पदार्पण केले. महात्मा गांधी गोपालकृष्ण गोखले यांना आपले राजकीय गुरु मानले. यावेळी पहिले महायुद्ध चालू होते आणि गांधीजींनी या युद्धात ब्रिटिशांना साथ दिली आणि भारतीयांना सैन्यात भरती होण्यासाठी प्रोत्साहित केले. या कारणास्तव त्याला 'भर्ती सार्जंट' म्हटले जाऊ लागले. ब्रिटिश सरकारने त्यांचा केसर-ए-हिंद या पदवीने सन्मान केला. पहिल्या महायुद्धातील सहकार्याच्या बदल्यात भारतीयांना स्वराज मिळेल, असा गांधीना विश्वास होता. गांधीजींनी 1915 मध्ये अहमदाबादमध्ये साबरमती आश्रमाची स्थापना केली. या माध्यमाने सर्जनशील कार्याला प्रोत्साहन देणे हा त्याचा हेतू होता. भारतीय राजकारणातील प्रभावशाली नेता म्हणून गांधींचा उदय, उत्तर बिहारचे चंपारण आंदोलन, गुजरातचे खेडा शेतकरी आंदोलन आणि अहमदाबादच्या कामगार वादाचे यशस्वी नेतृत्व केल्यानंतर हे घडले. चंपारण आणि खेडा चळवळ शेतक-यांच्या समस्यांशी संबंधित असताना, अहमदाबादच्या कामगारांच्या वादाच्या पार्श्वभूमीवर कापूस कापड गिरणी मालक आणि कामगारांमध्ये वेतन वाढ आणि प्लेग बोनस देण्याबाबत वाद झाला. अहमदाबादमधील प्लेग संपल्यानंतर गिरणी मालकांना बोनस रद्द करायचा होता. गिरणी मालकांनी केवळ 20 टक्के बोनस स्वीकारला आणि धमकी दिली की जो कर्मचारी हा बोनस स्वीकारणार नाही त्याला कामावरून काढून टाकले जाईल. 35 टक्के बोनसच्या कामगारांच्या मागणीला समर्थन देत गांधीजी स्वतः संपात सामिल झाले.  या संपूर्ण प्रकरणावर न्यायाधिकरणाने कामगारांच्या मागणीला न्याय दिला आणि 35 टक्के बोनसचे आदेश दिले. या गिरणी मालकांपैकी एक गांधींचे मित्र अंबालाल साराभाई होते, ज्यांनी साबरमती आश्रमाच्या बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक योगदान दिले. अहमदाबाद कामगार चळवळीत अंबालाल साराभाई यांची बहीण अनुसूयाही गांधी यांच्यासोबत होती.

गांधींचे आदर्श, तात्विक विचार, विचारधारा आणि जीवनपद्धती

    सत्याग्रहाच्या सुरुवातीच्या प्रयोगाच्या यशाने गांधीजींना सामान्य माणसाच्या अधिक जवळ आणले. गांधींचे आदर्श, तात्विक विचार, विचारधारा आणि जीवनपद्धती यांनी त्यांना सामान्य लोकांच्या जीवनाशी जोडले. ते गरीब, राष्ट्रवादी आणि बंडखोर भारताचे प्रतीक बनले. हिंदू-मुस्लिम ऐक्य, स्त्रियांची सामाजिक स्थिती सुधारणे आणि अस्पृश्यते विरोधात काम करणे ही त्यांची इतर मुख्य उद्दिष्टे होती. इ.स.1919 च्या जालियनवाला बाग हत्याकांडाने ब्रिटिश सरकारप्रती गांधींचा दृष्टिकोन बदलला आणि तद्दनंतर या सरकार विरोधी संघर्षाचे 'गांधी युग' सुरु झाले.

    उच्च विचार आणि साधे जीवन हेच त्यांना सर्वात प्रिय होते, जर संघर्ष असेल तर हिंसा का, एक मेकाच्या रक्ताची तहान का या माणसाला, असे ते म्हणत. बापूंकडून शिकलेल्या प्रत्येक गोष्टीचा योग्य मार्ग आहे, ज्या विचाराने क्रांती आणली ती गांधीवादी होती. तो एक विचार असा की, तुम्ही शेवटी केलेल्या अत्याचाराला कंटाळताल आम्ही जुलूम सहन करू पण आम्ही हात उचलणार नाही, हीच ती गांधी निति, गांधी विचार, आणि गांधीवाद म्हणून ओळखला गेला. परन्तु परिणामत: क्रांतिका-यात जहाल आणि मवाळ मतवादी अशा गटात विभाजन झाले. नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंग आणि राजगुरु यांच्या जहाल मतवादाचा अंतर्गत सामना बापूजी यांना करावा लागला. धर्माच्या नावावर मोहमद अली जीना सारख्या धार्मिक कट्टर पंथियाचा मुकाबला त्यांना करावा लागला. याचे पर्यावसन म्हणून धार्मिक दंगे सोसावे लागले. जनतेला अनेक हत्या, अत्याचार यांना सामोरे जावे लागले. धार्मिक व भौगोलिक फाळणी सोसावी लागली. याचे सर्व पातक, राजकीय रोष गांधीजीला पचवावे लागले. याच पुजनिय बापूजी (महात्मा गांधी) च्या स्मरणार्थ ही हिंदी काव्यपंक्ति!

राष्ट्रपिता तुम कहलाते हो सभी प्यार से कहते बापू,
तुमने हमको सही मार्ग दिखाया सत्य और अहिंसा का पाठ पढ़ाया,
हम सब तेरी संतान है तुम हो हमारे प्यारे बापू।
सीधा सादा वेश तुम्हारा नहीं कोई अभिमान,
खादी की एक धोती पहने वाह रे बापू तेरी शान।
एक लाठी के दम पर तुमने अंग्रेजों की जड़ें हिलायी,
भारत माँ को आजाद कराया राखी देश की शान।

गांधी सारखे लोक मरत नाहीत

[rb_related title="Also in This Issue" total="2"]

त्याच गांधींच्या देशवासी, तथाकथित एका राष्ट्रवादी म्हणवीणा-याने देश स्वतंत्र होताच त्यांचा जीव घेतला. हा कसला राष्ट्रवाद आहे! केवळ वैचारिक मतभेदामुळे एखाद्याला जीवे मारणे ही आपली संस्कृती कधीच नव्हती. मात्र "गांधी" सारखे लोक मरत नाहीत. गांधीजींना हवे असते तर ते त्यांच्या हत्येची घटना टाळू शकले असते. सरदार पटेल यांनी त्यांना आधीच याबाबत चेतावणी दिली होती. तसेच आवश्यक सुरक्षा व्यवस्था करण्यासाठी परवानगी मागितली होती. पण गांधीजींनी यास नकार दिला. कारण त्यांचे मते हे नंतर त्याच्या चारित्र्याला व विचाराला कमजोर करेल, जे त्याला कोणत्याही किंमतीला मान्य नव्हते. जीव देऊनही नाही. महात्मा गांधी त्यांच्या मृत्यूपर्यंत ते त्यांच्या चरित्रात राहिले, आणि ते चांगले अबाधित राहिले. म्हणूनच तो एक "महात्मा गांधी" आहे. ते विलक्षण आहेत, ते विलक्षण आहेत कारण इंग्रजांच्या सैन्य शक्ति, कूटनीतिचा मुकाबला त्यांनी सहनशक्तिच्या विलक्षण ताकदी च्या जोरावर केला. अहिंसा, उपोषण, आंदोलन या विलक्षण सोशिक नितिचा अवलंब केला, जे की संपूर्ण जगताला नाविन्यपूर्ण होते. नंतर ते जगाचा 'गांधी आदर्श' म्हणून आजपर्यंत अबाधित राहिले. मग हाच आदर्श अवलंबून अनेक जागतिक, अनेक राष्ट्रांचे अंतर्गत प्रश्न सुटले. म्हणूनच गांधींसारखा कोणी एकच महान व्यक्ति शतकात एकदाच जन्माला येतो, एक युगांतर…. आणतो. मग याच गांधीवादाचा, याच गांधीनितिचा अवलंब आपण वैयक्तिकरित्या, तसेच अनेक सामाजिक व राजकीय समस्यांमध्ये का करू नये.

Join us in celebrating the power of #storytelling

1 thought on “युगांतर: गांधीजी एक क्रांतिकारी युगपुरुष”

Leave a Comment